breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: कोरोना मात्र माणसावर नसून माणूसकीवर आलेल संकट- प.पु. देशमुख महाराज.

रक्तदान शिबीराच्या पहिल्या टप्प्यात ५० साधकांनी केले रक्तदान

पुणे: कोराना च हे संकट माणसावर मात्र नसून माणसातल्या माणुसकीवर देखील आहे. या संकटात जो माणुसकी जपेल तोच खरा माणूस समजावा! अशी भावना प.पु. देशमुख महाराजांनी व्यक्त केली. आध्यात्मा सोबत सामाजिक कर्तव्य पार पाडत फाऊंडेशनच्या वतीने आज आयोजित रक्तदान शिबिरात ५० साधकांनी रक्तदान केले. सोबतच दररोज २० गरजूंना जेवण व २० पोलीस व कचरा कर्मचारी वर्गाला सकाळचा चाय-नाष्टा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येत आहे.

कोरोना रूपी वैश्विक महामारीचे संकट राज्यासह देशभरात पसरले असतांना पुणे विभागात 640 पेक्षा जास्त कोविड19 पॉजेटीव्ह झाले आहे. अशा या परिस्थितीत काही ठिकाणी रुग्णाना लागणारा रक्त पुरवठा कमी पडत असून रक्त पुरवठा करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत व सामाजिक भान असलेले श्री. सदगुरू देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. पुना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बॅक, रास्ता पेठ, पुणे या ठिकाणी संपन्न झालेल्या या रक्तदान शिबीरात गर्दी होऊ नये म्हणून रक्तदात्यांची पुर्व नोंदणी करून प्रत्येकाला दिलेल्या वेळेतच येण्याची सुचना फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली होती, या सोबतच सोशल डिस्टट्न्स, मास्क, सॅनिटाइजर आदी शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करत आज 50 जणांनी पहिल्या टप्प्यात रक्तदान केले. शिबिरेच्या संपूर्ण आयोजनात परम पूज्य देशमुख महाराज, नक्षत्र नऊवारी संचालक उद्योजक गणेश तुम्मा, संजय देशमुख, सुवर्णा बोलघाटे आदींचा सहभाग होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button