breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात येणार आहेत. तसेच मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे.
ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी या फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाचं प्राधान्य द्यावे, असंही आवाहन मोहोळ यांनी केलेलं आहे. दरम्यान यापूर्वीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन मोहोळ यांनी केलेलं होतं.