breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: मंदिरं नसलेल्या गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी

पुणे: दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या  गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचं सावटओढवलेलं आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. मात्र, आता पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी केलेली आहे. पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत गुरुवारी (13 ऑगस्ट) बैठक झालेली आहे. यात ही सामूहिक मागणी करण्यात आलेली आहे.

“गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणं शक्य नाहीय. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाहीय. सजावट केली जाणार नाही. अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहेत. उत्सव मंदिरात केला, तर बंदिस्त जागेत गर्दी होण्याचा धोका अधिक आहे. उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे, अशी भूमिका या बैठकीत गणेश मंडळांनी मांडलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button