breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील औंध आयटीआय राज्यात सर्वोत्कृष्ट

पुणे – राज्यात शासनाच्या सुमारे 417 आणि खाजगी संस्थांच्या 400 पेक्षा जास्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आज कार्यरत असून या सर्व संस्थांमध्ये राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालयाने पुण्यातील औंध आयटीआयची सर्वोत्कृष्ट आयटीआय म्हणून निवड केली आहे. या शिवाय संस्थेतील तीन प्राध्यापक, सात विद्यार्थ्यी आणि संस्थेबरोबर काम करणा-या सहा कंपन्यांनाही राज्य सरकारच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय सात आणि खासगी दोन अशा एकूण नऊ आयटीआय संस्थांची निवड सदर मंत्रालयाने पारितोषिकासाठी केली आहे. यात पुणे जिह्यातील खेड येथील आयटीआयचाही समावेश आहे. या सर्व सस्था, प्राध्यापक, विद्यार्थ्यी आणि कंपन्यांना जागतिक युवा कौशल्य दिनी म्हणजेच 15 जुलैला, मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या आयटीआय संस्थांच्या स्पर्धेतून आयटीआय म्हणजे ज्यांना काहीच शिकता येत नाही अशा मुलांसाठीची संस्था ही आयटीआयची ओळख गेल्या चार वर्षात बदलत असून आयटीआय म्हणजे कौशल्य विकासाचे केंद्र अशी नवी ओळख या संस्थांना मिळत असल्याचे स्पष्ट होते.

सन 1946 साली स्थापन झालेली औंध आयटीआय ही राज्यातील एक जुनी संस्था आहे. या संस्थेत आज २४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण ३४ अभ्यासक्रम येथे शिकवले जातात. औद्योगिक मूल्य संवर्धनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम भक्कम करण्यासाठी जागतिक बँकेने निधी देऊन कौशल्य विकास मंत्रालयाने (स्किल्स स्ट्रेदनिंग फॉर इंडस्ट्रीयल व्हॅल्यूज एनहान्समेंट) म्हणजे “स्ट्राइव्ह” प्रकल्प सुरू करून त्यात औंध आयटीआयची निवड केली. यामुळे औंध आयटीआयचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. केंद्र सरकार देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करणार आहे. या नियोजित विद्यापिठासाठी देशातील सर्व आयटीआय संस्थांमधून दक्षिण भारततातील राज्यातील एक आणि पुण्याचे औंध आयटीआय अशा दोन संस्था या नियोजित विद्यापिठाच्या स्पर्धेत आहेत. राज्यात औंध आयटीआय सर्वोत्कृष्ट ठरल्याने संस्थेसाठी ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे. आयटीआयची परिक्षा ही गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते.

आज आयटीआय संस्था या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कुटुंबातील मुलांसाठी आर्थिक प्रगतीचे केंद्र झाले असून ही मुले आयटीआयमध्ये शिकून स्वत:च्या पायावर उभी रहात आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देणारे महत्वाचे घटक होत आहेत. आयटीआयकडे येणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळेच शाससाने राज्यातील सर्व आयटीआयमध्ये केंद्रीय प्रवेश पद्धती लागू केली. प्रवेश देण्याचे काम ऑन लाइन केल्यामुळे त्यात पारदर्शकता आली आहे.

औंध आयटीआयमध्ये पारंपारिक टर्नर, फिटल, वेल्डर, इलेक्ट्रीकल अशा अभ्यासक्रमासोबतच रोबोटिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक – मेकॅनिकलचे अधुनिक तंत्रज्ञान मेकॅक्ट्रॉनिक्स, असे अधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रमही शिकवण्यास सुरूवात केली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सुमारे तीसपेक्षा जास्त कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओंची मिटिंग औंध आयटीआयमध्ये घेतली. कंपन्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. अशा बारा कंपन्यांबरोबर आम्ही सामंजस्य करार केले असून त्यांना त्यांच्या प्रयोग शाळा उभ्या करण्यासाठी औंध आयटीआयमध्ये जागा दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यातून मिळू लागला.

या सोबतच विद्यार्थ्यांसाठी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नेऊन तेथे चालणा-या कामांची महिती देण्याचा उपक्रम सुरू केले. आज औंध आयटीआयमध्ये टाटा मोटर्स, सॅमसंग, मारूती, होंडा, सँण्डविक अशा कंपन्यामधील तंत्रज्ञांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. यातून आयटीआयची शेवटची परिक्षा उत्तीर्ण होतानाच त्यांना कंपन्यांमध्ये नोकरी सहजपणे मिळू लागली. औंध आयटीआयमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येऊ लागल्या आहेत. त्यातून आमच्या संस्थेतील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना नोक-या मिळतात असेही आमदार काळे यांनी स्पष्ट केले. उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमात केवळ औंध आयटीआयमधील नव्हे तर एकूण ८४ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, ५४ पॉलिटेक्निक महाविद्यालयातील आणि २४ आयआयटीमधील आणि ११४ विविध कंपन्यांमधील अशा एकूण ८४२७ विद्यार्थ्यांना किंवा प्रशिक्षणार्थींना औंध आयटीआयमध्ये काही आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button