breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: कोरोनाग्रस्त कैद्यांना ठेवण्यास विरोध
आर्थर रोड कारागृहातील करोनाबाधित कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. आर्थर रोड कारागृहातील ७२ कैद्यांना माहूल येथील इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यावर विचार सुरू आहे. मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. प्रदूषित माहूलमध्ये या कैद्यांना आणल्यास स्थानिकांमध्ये करोनाचा प्रसार होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.