breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: औषधांचा साठा करण्यासाठी चीनने लपवली कोरोना व्हायरसची तीव्रता, धक्कादायक खुलासा

करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा करण्यासाठी चीनने व्हायरसची तसंच हा किती धोकादायक आजार आहे याची माहिती लपवल्याचा अमेरिकेतील अधिकाऱ्यांचा आरोप आहे. गुप्तचर विभागाने यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे. चीनने जाणुनबुजून करोना महामारी किती गंभीर आजार आहे याची माहिती लपवली असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाल्याचीही अहवालात नोंद आहे.

होमलँड सेक्युरिटीने १ मे रोजी हा चार पानांचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल Associated Press च्या हाती लागला असून त्यांनी हे वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार चीनवर टीका करत असतानाच हा अहवाल समोर आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी याआधी चीनमुळेच करोनाचा फैलाव झाला असून त्यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलं होतं.

चीनवर नाराजी व्यक्त करताना विरोधक सरकारच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. करोनाशी लढताना सरकारची प्रतिक्रिया अपूर्ण आणि अत्यंत धीमी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेवरुन लक्ष वळवण्यासाठी चीनवर टीका केली जात असल्याचा आरोप केला आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, करोनाची गंभीरता लपवताना चीनने औषधांची आयात वाढवली आणि निर्यात कमी केली. तसंच चीनने जवळपास संपूर्ण जानेवारी महिना जागतिक आरोग्य संघटनेला करोना व्हायरस साथीचा आजार असल्याची माहिती न देता लपवून ठेवली, जेणेकरुन इतर देशांमधून वैद्यकीय पुरवठा मागवण्यात येईल. यावेळी फेस मास्क, सर्जिकल गाऊन तसंच ग्लोव्ह्ज यांची आयात वाढली होती. रिपोर्टनपसार, चीनच्या आयात आणि निर्यातीत झालेले बदल हे सामान्य नव्हते हे स्पष्ट दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button