breaking-newsपुणे

कसबा गणपतीचे दर्शन घेत राज ठाकरे यांनी प्रचाराचा फोडला नारळ

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कसबा गणपतीचे दर्शन घेत विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. आज राज ठाकरे कसबा गणपतीच्या दर्शनासाठी येत असल्याचे मनसेच्या कार्यालयातून कळवण्यात आले होते. मात्र कोणताही गाजावाजा न करता त्यांना हा कार्यक्रम आटोपायचा होता. त्यानुसार राज यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. शिवाय त्यांनी आरतीतही आपला सहभाग नोंदवला.

या वेळी कसब्यातील उमेदवार , शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह पुण्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज ठाकरे तिथून मुंबईला रवाना झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button