breaking-newsमुंबई

#CoronaVirus | एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही – यशोमती ठाकूर

मुंबई | अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचविला जाईल.  एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ॲड. ठाकूर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या. घरपोच पोषण आहार वेळेत पोहोचण्यासाठी ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांअंतर्गतचे धान्य उपलब्ध झाले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने तसेच धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button