breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: उस्मानाबादकरांची चिंता वाढली, फळविक्रेत्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह

लॉकडाउनच्या काळातही ग्रीन झोनमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी यंत्रणा धडपडत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता वाढली आहे. मागील महिनाभरापासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 37 दिवसांनंतर एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. वाहतूक व्यवसाय करणारा हा तरुण करमाळा, नवी मुंबई, वाशी आणि पुणे येथे टरबुज, खरबूज आणि पपई विक्रीसाठी घेऊन जात होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button