breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | उदगीर शहरातील रेडझोन परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याने पोलिसांची नजर

लातूर | जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातल आहे. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. पसरत असलेला हा संसर्ग थांबवण्यासाठी पोलीस महसूल व नगर परिषद प्रशासन दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले परिसर चौदा दिवसासाठी सील करण्यात आले आहे. मात्र नागरिक या सर्व गोष्टी गांभीर्याने घेत नसल्यामुळे प्रशासनाला कार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रेडझोन परिसरात लोकांनी एकमेकाच्या संपर्कात येऊ नये यासाठी परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी उदगीर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, मुख्याधिकारी भारत राठोड यांनी पोलीस प्रशासनाला ड्रोन उपलब्ध करून दिला आहे. या ड्रोन कॅमेराद्वारे उदगीर शहरातील मुसानगर, चर्च रोड , खडकाडी गल्ली , किल्ला गल्ली , पैगंबर पुरा या भागावर नजर ठेवली जाणार आहे. जेणेकरून कोणीही घराबाहेर येऊ नये एकमेकाच्या संपर्कात येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button