ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, मुंबईसाठी रेल्वेच्या २२ फेऱ्यांची घोषणा

परभणी | उन्हाळ्याच्या धगधगत्या गर्मीत रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा देत. नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातून मुंबई आणि उपनगरात जाण्यासाठी काझीपेठ-दादर-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वेच्या २२ फेऱ्या चालवण्याची घोषणा नांदेड रेल्वे विभागाने केली आहे. यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसांत मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात मुंबई उपनगरांकडे धावणाऱ्या गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी दमरेच्या नांदेड रेल्वे विभागाने २५ मेपासून ते ३० जून दरम्यान काझीपेठ-दादर-काझीपेठ दरम्यान नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना औरंगाबाद, नगरसोल, मनमाड मार्गे २२ फेऱ्यांची साप्ताहिक रेल्वे सुरू केली आहे. गाडी क्रमांक ७१९५ ही २५ मे, १ जून, ८ जून, १५ जून, २२ जून, २९ जून रोजी काझीपेठ येथून सायं ५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी १ वाजून २९ मिनिटांनी दादर येथे पोहोचेल. अशा ६ फेऱ्या. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ७१९७ दुसऱ्या दिवशी दादर येथून रात्री ९.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता काझीपेठ येथे पोहोचेल. आठवड्यात ही रेल्वे २६ मे, २ जून, ९ जून, १६ जून, २३ जून, ३० जून रोजी ६ फेऱ्यात धावेल.

गाडी क्रमांक ७१९७ ही काझीपेठ येथून सकाळी ११.३० ला सुटून दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी २८ मे, ४ जून, ११ जून, १८ जून, २५ जून रोजी ५ फेऱ्यात धावेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ७१९८ ही गाडी दादर येथून रात्री ९.४५ वाजता सुटून काझीपेठ येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी २९ मे, ५ जून, १२ जून, १९ जून, २६ जून, दरम्यान ५ फेऱ्यात चालवली जाणार आहे. यागाडीत वातानुकूलित, शयनयान, जनरल डब्बे असणार आहेत. या साप्ताहिक रेल्वेचा अधिकाधीक रेल्वे प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button