breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: आधी नवनीत राणा, आता रवी राणांना कोरोनाचा संसर्ग, कुटुंबातील एकूण 12 जण बाधित

अमरावती: खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचादेखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. राणा कुटुंबातील बारा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राणा दाम्पत्याच्या दोन लहान मुलांचाही समावेश झालेला आहे. त्याचबरोबर रवी राणा यांच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे नवनीत राणा आणि रवी राणादेखील गेलेले होते. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झालेली आहे. “अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button