breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: आता नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर: देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त उद्रेक झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्धपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करत असतांना खासगी हॉस्पिटल्सनांही सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांचं पालन न करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, खासगी रुग्णालय पेशंटना तपासत नाहीत अशा तक्रारी समोर येत आहेत. असं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कडक करावाई करण्यात यईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. खासगी हॉस्पिटल्सनी Antigen kit ठेवल्या पाहिजेत असं मतही त्यांनी व्यक्त केलेलं आहे. राज्याची गरज लक्षात घेऊन सरकार नव्या 500 Ambulance खरेदी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.

राज्यात शनिवारी तब्बल 12822 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 275 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका एवढा झालेला आहे. तर 11081 रुग्णांना घरी डिस्चार्ज दिला, आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात एक लाख 47 हजार 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे असून त्यानंतर  22943 ठाणे येथे आहेत. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button