breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र, राज्यपालांचीही भेट घेणार

मुंबई: ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलेले आहे. अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत. “परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशा’ स्वयंसेविकांना दर महिन्याला चार हजार ते दहा हजार रुपये इतका मोबदला मिळत आहे.” याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

“आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.
त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.” अशी माहिती अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. “आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही” अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

https://m.facebook.com/amitthackerayofficial/posts/1194113637609653?refsrc=http%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Famit-thackeray-writes-to-ajit-pawar-rajesh-tope-on-asha-worker-pay-to-meet-governor-233657.html

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button