Uncategorized

#CoronaVirus: अभिजीत केळकर, पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची बाधा

मुंबई: अभिनेता सुबोध भावेनंतर मराठी मनोरंजन विश्वातील आणखी काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर या शोमधील मेंटॉर आणि गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर आणि दोघा क्रू मेम्बरनाही कोरोना झालेला आहे.अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक देखील होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला आहे.

“नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली, जी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे. माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे अगदी ठणठणीत आहेत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत” अशी पोस्ट अभिजीतने इन्स्टाग्रामवर केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button