breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यात एका दिवसात सापडले कोरोनाचे 7 रुग्ण

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर असलेला अकोला जिल्हाही आता कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अकोल्यात आज कोरोनाचे तब्बल 7 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे.

अकोल्यात दोन रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली होती. त्याचे अहवाल आले आहेत. प्रशासनाने एकूण १४८जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १०९ जणांचे अहवाल आले असून त्यापैकी एकूण ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

एकूण ९ कोरोना रुग्णांपैकी सात जणांचे अहवाल आज आले. हे सर्वच्या सर्व नऊजण वाशिममधील एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं.दरम्यान, जिल्ह्यात सात कोरोना रुग्ण सापडल्याने अकोल्यातील ग्रामस्थांमध्ये सध्या भितीचं वातारण निर्माण झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button