breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डिकर बनले ‘भाजपचे प्रवक्ते’,राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

  • आयुक्तांच्या दालनास भाजप कार्यालयाचे नामकरण

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) आयुक्तांच्या दालनाचे भाजप कार्यालय म्हणून नामकरण केले. तसेच श्रावण हर्डीकर हे प्रवक्ते भाजप’ असे फलक लावले आहेत. आयुक्त कार्यालय भाजपचे झाल्याच्या घोषणा यावेळी राष्ट्रवादी नगरसेवकांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे नागपुरहून आलेले आहेत. त्यांनी महापालिकेचा पदभार घेतल्याने काही दिवसात वादात सापडण्यास सुरुवात झाली. तसेच आयुक्त हे सत्ताधारी भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी टीका विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेकडून यापुर्वी झालेली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 25) थेट भाजप पक्ष कार्यालयात हजेरी लावली. शिष्टाचार संकेत बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले. सनदी अधिका-याने सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात जाण्याची महापालिका इतिहासातील पहिलीच घटना अडली आहे. आयुक्त हर्डीकर भाजपचे हस्तक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या कार्यालयावर भाजप पक्ष कार्यालय, श्रावण हर्डीकर प्रवक्ते भाजप’ असे फलक लावले आहेत.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, राहुल भोसले, विनोद नढे, जावेद शेख, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर सहभागी झाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button