breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रुग्णालयांमधील खाटांच्या उपलब्धतेबाबत मुंबईतील नागरिकांच्या तक्रारी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

आम्हाला कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेतले जात नाही आणि इकडून तिकडे केवळ भटकावे लागते, अशा स्वरूपाचे दूरध्वनी मला मुंबईतील असंख्य रूग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. राज्य सरकारने तत्काळ एक डॅशबोर्ड तयार करून रुग्णालयातील उपलब्धता सांगितली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच, रूग्णालयातील खाटांची ही उपलब्धता सार्वजनिकपणे लोकांना कळेल, अशापद्धतीने ऑनलाईन स्वरूपात असावी. जेणेकरून रूग्णांना आपल्याला कोणत्या रूग्णालयात जाऊन उपचार घ्यायचे आहेत, हे आधीच कळू शकेल आणि ते त्याच रूग्णालयात जातील. त्यांची परवड थांबेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button