breaking-newsमुंबई

#Coronavirus:दादर स्मशानभूमीत कोविड मृतदेहांचं दहन करण्यास स्थानिकांचा विरोध

मुंबई : कोरोना बाधितांसोबतच कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. याचा परिणाम आता शहरातील स्मशानभूमीवर होताना दिसत आहे. सातत्यानं क्षमतेपेक्षा जास्त कोविड मृतदेहांचं दहन केल्यानं दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. मुंबईतल्या पहिल्या कोविड मृतदेहाचं दहन करणाऱ्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आतापर्यंत 150 पेक्षा जास्त मृतदेहांचं दहन करण्यात आलंय. या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने याचा धोका त्यांना होऊ शकतो. त्यामुळे कोविड रुग्णांच्या मृतदेहाचं दहन दुसरीकडे करण्याची मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे.

एकीकडे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढतेय. तर दुसरीकडे कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत चाललाय. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर तातडीनं अंत्यविधी होणं गरजेचं असतं. मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमधल्या विद्युतदाहिनीत सध्या मोठ्या संख्येनं कोविड मृतदेह दहनासाठी आणले जातायेत. मात्र, आता क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह रोज दहन होत असल्यानं या स्मशानभूमीवरचा ताण वाढलाय. त्यामुळे याठिकाणचं कोविड मृतदेहांचं दहन थांबवां, असं पत्र येथील नगरसेविका आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला दिलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button