breaking-newsआंतरराष्टीय

#Coronavirus#जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 46 लाखांवर तर 17.50 लाखांहून अधिक रुग्ण बरे

मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 46 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात 99,116 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5,050 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 308,642 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,758,032 इतके कोरोनाबाधित बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 85,784 रुग्ण, तर 2,753 बळी कोरोनामुळं गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button