breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:चीनपेक्षा भारतातून येणारा कोरोना घातक ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा दावा

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात अक्षरशः धुमाकूळ घालता आहे. आतापर्यंत जगभरात ४.९७ मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १.८९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये ३,२७,००० लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत १,०७,००० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधून ४२,२९८ रूग्ण बरे झाले असून ३,३०३ लोकांचा जीव गेला आहे. 

कोरोनावरून आता नेपालचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी असा दावा केलाय की,’भारतातून येणारं कोरोना व्हायरसचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा अधिक घातक आहे. देशात कोविड-१९ च्या वाढत्या आकड्याला भारतात अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिकांना जबाबदार धरलं आहे.’

ओली यांनी मंगळवारी कोविड-१९ या जागतिक महामारीबद्दल संसदेत सांगितलं की,’बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे नेपाळमधील कोरोनाचं संक्रमण रोखणं हे कठीण झालं आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक रूग्णांनी नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. हा व्हायरस बाहेकून आला आहे. आमच्या इथे तो नव्हता. सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीला आम्ही रोखू शकलो नाही.’

देशासमोर सर्वांत मोठं आव्हान हे कोरोना व्हायरसचं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला देशव्यापी लॉकडाऊन तोडणाऱ्या नागरिकांना आणि विशेष करून ज्या नागरिकांनी भारतातून नेपाळमध्ये प्रवेश केला त्यांना जबाबदार धरलं आहे. पुढे ओली असं देखील म्हणाले की,’भारतात येणारा कोरोना व्हायरस हा चीन आणि इटलीपेक्षा देखील घातक आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button