breaking-newsआंतरराष्टीय

#Coronavirus:कोरोना वर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंगटन : भारतीय-अमेरिकन एक महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, असं संबोधत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, ‘मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.’

ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र असल्याचं सांगितलं. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी बोलताना या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा त्याच्या काही दिवसांनी कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असं सांगतिलं आहे.

ट्रम्प यांच्याकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात नियुक्त करण्यात आलेल्या एक माजी औषध कार्यकारी मोनसेप स्लोई यांनी बोलताना सांगितलं की, ‘आमचा प्रयत्न या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध करण्याचा आहे.’ दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रोज गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, त्यांना अमेरिकेतील आर्थिक व्यवहार पुन्हा सुरु होण्यासोबतच अर्थचक्र सुरळीत होताना पाहायचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button