breaking-newsआंतरराष्टीय

#Coronavirus:कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार

नवी दिल्ली : भारताने कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनला मागे टाकत कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोना विषाणूचा जिथे जम्न झाला त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या कोरोना विषाणू रिसोर्स सेंटरने माहिती दिली आहे.

चीनमध्ये काल 82 हजार 929 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर भारतात काल 82,085 रुग्ण होते. मात्र, आता हा आकडा वाढून थेट 85 हजार 784 वर पोहोचला आहे. तर चीनमध्ये 84 हजार 031 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच भारतात चीनच्या तुलनेत 1 हजार 753 अधिक रुग्ण आहेत.

भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 699 रुग्णांची भर पडली आहे. इतकंच नाही तर गेल्या 24 तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. भारतात आतापर्यंत 27 हजार 900 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

भारतात महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट आहे. इथे गेल्या 24 तासात कोरोनाचे 1576 नवे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान, तब्बल 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 29100 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1068 जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button