breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; रुग्णांसह मृतांची संख्याही लक्षणीय

मुंबई – राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

दिवसभर लाॅक़डाऊन असताना सुद्धा राज्यात तब्बल 63 हजार 282 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, काल तब्बल 802 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिकाधिक वाढत आहे. तसेच रूग्णसंख्याही हळुहळु आटोक्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात 6 लाख 63 हजार 758 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर 24 तासात 61 हजार 326 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 4 हजार 069 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button