breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवडणुकीच्या मतदान बुथ धर्तीवर कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावीत- संदीप काटे

  • लस घेणा-या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी

पिंपरी / महाईन्यूज

राज्य सरकारच्या निर्णयानुसार 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रभागस्तरावर हे अभियान राबवावे. निवडणूक विभागाच्या मतदान बुथ धर्तीवर प्रभागातील लोकसंख्येचा ओघ पाहून चार ते पाच ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करावी. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले नाव नोंदवून लस घेता येईल. यामध्ये नागरिकांची विनाकारण फरपट होणार नाही याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्यस्थितीला महापालिकेच्या वतीने ५५ आणि खासगी ११ केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध केली आहे. शहरात ४५ वर्षांपुढील सुमारे ३ लाख ८० हजार नागरिकांना आजअखेर लस देण्यात आली आहे. सध्यस्थितीला शहरातील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहीम सक्षमपणे राबविली जात नसल्याचे समोर आले आहे. अशातच राज्य सरकार 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा विचार करत आहे. त्यासाठी लसीचे वितरण आणि नियोजन सक्षमपणे होणे गरजेचे आहे. कारण, एकाचवेळी लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे नियोजन फिस्कटण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागरिकांची ससेहोलपट होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे काटे यांनी म्हटले आहे.

लसीकरणाचे नियोजन फेल जाणार नाही, यासाठी पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागामध्ये किमान चार ते पाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावीत. प्रभागातील लोकसंख्येचा ओघ विचारात घेऊन निवडणूक आयोगाच्या मतदान बुथ धर्तीवर त्या भागासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे. लसीकरण केंद्रासाठी शाळा अधिग्रहीत केल्यास त्याठिकाणी प्रशासनाने मतदान प्रक्रिया ज्या पध्दतीने घेतली जाते, त्याच पध्दतीने लसीकरण प्रक्रिया पार पाडावी. त्याठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकाला लस मिळालीच पाहिजे. नाव नोंद केल्यानंतर आतमध्ये प्रवेश देऊन डोस देण्याची व्यवस्था करावी. सोशल डिस्टंसिंग आणि तत्सम नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण मोहिम पार पडली पाहिजे. त्यामध्ये नारिकांना कसलाही त्रास होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना पालिका प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

 

वाचा’- “चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील”- किरीट सोमय्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button