breaking-newsआंतरराष्टीय

#CoranaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 90 लाख पार

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे  90 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 54 तासात 3338 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर एक लाख तीस हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 90 लाख 45 हजार 457 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख  69 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 48 लाख 33 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे  426,910 रुग्ण आहेत. तर 13,703 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button