TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ ; महिन्याला 1.80 लाख प्रवाशांचे उड्डाण

नागपूर | कोरोनापूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांची संख्या दरमहा 2.25-2.50 लाखपर्यंत पोहोचली होती. जाणकारांनी सांगितले की, प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याला वाढ होत आहे. बऱ्याच दिवसांपर्यंत आकडा 1.5 लाखच्या जवळपास अडकला होता, परंतु आता दरमहा 1.80-1.90 लाख प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे. नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळात दरमहा प्रवाशांची संख्या 30 हजार ते 40 हजारापर्यंत आली होती, ती आता सरासरी 1.80 लाखपर्यंत पोहोचली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहून मिहान इंडिया लि.चे अधिकारी अत्यंत उत्साहित असून लवकरच प्रवाशांची संख्या 2 लाख दरमहाच्यावर जाण्याचीही त्यांना अपेक्षा आहे. याशिवाय काही नवीन फ्लाइट्स सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

सहा हजार प्रवासी दररोज
सध्या दररोज विमानाने बाहेर जाणाऱ्यांची संख्या 3,000 ते 3,100 पर्यंत पोहोचली आहे. तर एवढेच प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणांवरून नागपुरातही येत आहे. म्हणजेच एका दिवसात प्रवासी संख्या जवळपास 6,000-6,200 पर्यंत पोहोचली आहे.

कोरोनापूर्वी नागपुरात प्रवाशांची संख्या वर्षाला 30 लाखांपर्यंत पोहोचली होती. हा आकडा एका मोठ्या विमानतळाचा संकेत देणारा होता, परंतु कोरोनाने संपूर्ण खेळ बिघडविला. कोरोनादरम्यान प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण नोंदविण्यात आली. यादरम्यान अनेक एयरलाईन्सने विमानांची संख्यासुद्धा केली, याचाही विपरित परिणाम झाला. यंदा प्रवाशांची संख्या 20 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

25 विमानांचे दररोज येणंजाणं
सध्या नागपूर विमानतळावरून दररोज 25 विमानांचे मुव्हमेंट होत आहे. 25 विमान येथून जात आहे तर जवळपास एवढेच विमान नागपुरात येत आहे. कोरोनापूर्वी विमानांची संख्या सरासरी प्रति दिवस 32 पर्यंत पोहोचली होती. विमानांची संख्या पर्याप्त असल्याने प्रवासीसुद्धा अधिक होते. कोरोनानंतर एविएशन सेक्टरमध्ये बदलही दिसून आला. एयर इंडियाचे विमान कमी झाले. काही मार्गांवरही सेवा कमी झाली. आता नवीन एयरलाईन्स सुरू झाल्यानंतर विमानतळाची स्थिती एकदा पुन्हा बदलेल, अशी विमानतळ अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. नवीन मार्ग आणि विमान सेवेतही वाढ होण्याची शक्यता अधिकारी वर्तवित आहे.

महसुलातही वाढ
वर्ष 2021-22 मध्ये विमानतळाचा महसूल जवळपास 60 कोटी रुपये होता, तो वित्त वर्ष 2022-23 मध्ये 80 कोटीवर गेला आहे. आता अपेक्षेनुसार यात पुन्हा वाढ होऊन विमानतळ चांगल्या स्थितीत येईल. कोरोनापूर्वी विमानतळाचा महसूल 100 कोटी रुपयांवर होता. लवकरच हा आकडा गाठणे शक्य होईल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button