ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

व्यासपीठावर कॉँग्रेसचे नेते हजर; कार्यकर्ते मात्र गायब

रवींद्र धंगेकर यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा झाला असून आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशातच उरर्वित तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराचा चांगलाच धुराळा उडत आहे. मात्र पुण्यात महाविकास आघाडीचे नेतेच व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. मात्र कार्यकर्ते कुठेच दिसत नसल्याने उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सध्या दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कॉंग्रेस अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. यातच आता पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराची धुरा कॉंग्रेने मोहन जोशी यांच्याकडे दिली आहे. तर शहाराध्यक्ष अरविंद शिंदे हे समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे संजय मोरे, गजानन थरकुटे, शहराप्रमुख आहेत. आम आदमी पार्टीकडून मुकुंद किर्दत, शहाराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आहेत.

मात्र एका बाजूला महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी महायुतीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीसह ३६ संघटना सहभागी झाल्या आहेत. मात्र धंगेकरांच्या प्रचाराचा धुराळा शहरात उडतो आहे, असे काही दिसायला तयार नाही. यातच कॉंग्रेसकडून धंगेकर यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये फक्त कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याने अन्य नाराज असल्याचे दिसून येत आहेत.

यातच गेल्या काही दिवसापासून कॉंग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांवरून वादविवाद होत असल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्षाचे नेते किंवा प्रमुख पदाधिकारी, त्यात कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button