breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमुंबईराजकारण

महावितरणच्या कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन

मुंबई :

महावितरणच्या वीज देयकांच्या अर्थात बिलिंगच्या बाबतीत २०२० -२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. मात्र डिसेंबर २०२२ पर्यंत ती संख्या २.७२ लाख इतकी कमी झाली. बिलिंगमध्ये गुणात्मक सुधारणा दिसत असून येत आहे. केलेल्या कामाबद्दल महावितरणचे अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नागपूर येथे विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान म्हणाले.

बिल देण्यासाठी मीटरचा फोटो काढला जातो. अचूक देयक देण्यासाठी मीटर वाचन अचूक होणे गरजेचे आहे. मीटरचे फोटो तपासणी करताना संपूर्ण राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण जानेवारी २०२२ मध्ये ४५.६ टक्के होते. ते प्रमाण नोव्हेंबर २०२२ मध्ये १.९ टक्के इतके कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये बिलिंग तक्रारी १० लाख २२ हजार इतक्या आल्या. त्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये ४ लाख ५८ हजार झाली. पंधरा डिसेंबर २०२२ पर्यंत बिलिंग तक्रारींची संख्या २ लाख ७२ हजारपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून ज्या मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्याचा अहवाल असमाधानकारक होता अशा ७६ एजन्सींना बडतर्फ करण्यात आले तर तीन एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात आले. राज्यात सरासरी देयकांचे प्रमाणही कमी झाले आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पनवेल तालुक्यात मीटरच्या फोटो पडताळणीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये अस्पष्ट फोटोंचे प्रमाण १२ टक्के होते ते नोव्हेंबर अखेर १.३ टक्के इतके कमी झाले. या तालुक्यात सरासरी देयकांचे प्रमाणही जुलै महिन्यातील ७.३ टक्क्यांवरून घसरून नोव्हेंबरमध्ये ५.७ टक्के इतके कमी झाले आहे. चुकीच्या मीटरवाचन आणि इतर त्रुटींबाबत या विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांना चालू आर्थिक वर्षात ६ लाख ५९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पनवेल तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकांच्या संदर्भात सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर व इतर सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button