breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

मार्च महिन्यातच पूर्ण करा ‘ही’ ५ महत्वाची कामे! अन्यथा वाढतील अडचणी

Financial Deadlines | २०२३-२४ आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी काही महत्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यामध्ये मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीपासून ते कर सवलतीसाठी गुंतवणूक करणे, विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणे इत्यादी अनेक कामांचा समावेश आहे. जाणून घेऊयात ३१ मार्चपूर्वी नेमकी काय काय कामे करावी लागणार आहेत.

आधार कार्ड अपडेट

UIDAI ने आधार अपडेट करण्याची शेवटची संधी दिली आहे. आता तुम्ही आधारकार्ड १४ मार्चपर्यंत अपडेट करू शकता. तुम्ही तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी मोफत अपडेट करू शकता.

SBI ची विशेष FD योजना

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी ४०० दिवसांची विशेष FD योजना अमृत कलश लाँच केली आहे. या याजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. या विशेष एफडीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे.

हेही वाचा      –      पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल 

SBI गृहकर्ज दर

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष गृहकर्ज मोहीम आणली आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर ६५ ते ७५ बेसिस पॉइंट्सची सूट मिळत आहे.

IDBI बँकेची विशेष FD योजना

IDBI च्या विशेष FD योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे. या विशेष योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के ते ७.७५ टक्के व्याजरद मिळतो. या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ आहे.

कर सवलतीसाठी गुंतवणुकीची अंतिम मुदत

वर्ष २०२३-२४ मध्ये कर सवलतीसाठी गुंतवणूक करायची शेवटची संधी ३१ मार्च २०२४ आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत PPF, SSY सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला या आर्थिक वर्षात १.५० लाख रूपयांची सूट मिळू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button