breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस; खुलासा करा अन्यथा कारवाई करू

दोन समाजात तेढ निर्माण करण्याच चित्रा वाघ यांचा प्रयत्न

मुंबई : उर्फी जावेद विरूद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ प्रकरण चांगलच पेटलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे.
राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करतो असं असताना राज्य महिला आयोगाची प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन चित्रा वाघ यांनी केले आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली आहे चित्रा वाघ यांनी 2 दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल, असा थेट इशारा आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो. खोटी माहिती चित्रा वाघ यांनी काल दिली. तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button