breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

महाराष्ट्रात सिंगल युज प्लॅस्टिकवर एक मेपासून बंदी

मुंबई | दोन वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे वेगवेगळ्या वेळी समोर आले आहे. पण आता पुन्हा एकदा राज्यात एकदा वापराच्या (सिंगल युज) प्लॅस्टिकवर बंदी घालण्यासाठी नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी एक मेपासून राज्यात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रचार मोहिम आखण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडूनही या संदर्भात त्यांचा प्लॅन मागवून घेण्यात येणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हा प्लॅन राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button