breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

देशात आचारसंहिता लागू, उल्लंघन केल्यास काय होतं? वाचा..

Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. संपुर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर काही राज्यात पोटनिवडणुका तसेच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यातच आजपासून संपुर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमांवर आणि कामांवर बंदी घातली जाते. नेमक्या कोणत्या गोष्टींवर आचारसंहिता काळात बंदी असते? वाचा..

आचारसंहिता म्हणजे काय?

आचारसंहिता म्हणजे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेली नियमावली. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.

आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत?

मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.

हेही वाचा    –    इंद्रधनुष्य का आणि कसे तयार होते? जाणून घ्या यामागील विज्ञान 

आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.

मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरतं.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.

आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं, अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांत बसत नाही.

आचारसंहिता न पाळल्यास काय होतं?

आचारसंहितेचे पालन केले नाही तर कायदे आणि नियमांचे उल्लंघन मानले जाते. जी व्यक्ती किंवा पक्ष या नियमांचं उल्लघंन करते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. त्या व्यक्तीला बडतर्फही केलं जातं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button