breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा इशारा

 

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदलले आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक स्तरावर ला निनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गतवर्षी १५ मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला होता. परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. याच बदलत्या हवामानामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २३ आणि २४ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आधीपासूनच अवकाळीने राज्याची चिंता वाढवली आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळी संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलते हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button