TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका

टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकले स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य

पुणे : भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते गिरीश खत्री यांच्या स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका पाहायला मिळाला. भारतातील पहिली स्वच्छतेच्या बाबतीतील अशी स्पर्धा असल्याने थेट टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य झळकले आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच या स्पर्धेच्या लोगोच्या अनावरणाचा सोहळा पार पडला होता त्याची दृश्ये टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली आहेत.

संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती करण्याचे काम केले होते. हाच वसा पुढे नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी गिरीश खत्री हे प्रयत्न करत आहेत. यातूनच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ नमो करंडक स्पर्धा २०२३’या स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

गिरीश खत्री यांचे जे उपक्रम असतात ते अतिशय भव्यदिव्य आणि अद्वितीय अशा स्वरूपाचे असतात. सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून ते अनेक लोकाभिमुख असे अनेक उपक्रम राबवत असतात याच साठी त्यांचा कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात लौकिक आहे. स्वच्छतेचा नमो करंडक हि स्पर्धा देखील अशी एक अभिनव अशी सपर्धा असून या स्पर्धेत प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. यानंतर तज्ञ परीक्षक त्या सोसायटीला प्रत्यक्ष भेट देवून परीक्षण करतात. यानंतर सर्वात स्वच्छ सोसायट्यांना बक्षीसदेत गौरव केला जातो. या स्पर्धेला आता मोठा प्रतिसाद मिळू लागला या स्पर्धेत पहिल्या वर्षी ४२ सोसायट्यांनी सहभाग नोंदवला होता तर या वर्षी तब्बल ९० सोसायट्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आता तिसऱ्या पर्वात कमीत कमी २०० सोसायट्या सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

याबाबत बोलताना खत्री म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच स्वच्छतेचा जागर व्हावा हीच यामागील संकल्पना आहे. आज आमच्या या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकणे हि निश्चितच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जो हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत त्याची अशा पद्धतीने जागतिक स्तरावर दखल घेतली जात असेल तर आमच्यासाठी हि बाब अभिमानास्पद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button