breaking-newsTOP Newsदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूल-महानगरपालिकातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छता मोहीम

पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडीयम स्कूल रहाटणी पुणे -१७ येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रणय चव्हाण (आरोग्य निरीक्षक) भुषण पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरी किंवा घराचे परिसरात बंदी असलेले प्लास्टिक गोळा करून ते शाळेत जमा करण्याबावत आवाहन करण्यात आले . त्या अनुषगाने शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर व झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड, साफ सफाई करूया बिमारी हटवूया. पुढील पिढीसाठी चांगली देणं माझा परिसर स्वच्छ ठेवेन असे घोषवाक्य देऊन रहाटणी पिंपळे सौदागर मध्ये स्वच्छता मोहिमेमार्फत जनजागरण केले. यावेळी शाळेतील पाचवी ते दहावी विदयार्थी , शिक्षक व आदित्य ओव्हाळ, अक्षय पाटील, अनिकेत खरात आकाश बंदपाटे, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृन्द हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण सरानी स्वच्छते बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शेन केले व महापुरुषांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तन्मय इंगळे या विद्यार्थ्याने केले तर समृद्धी जगताप, राहुल चौधरी, दानिश रझा, या विद्यार्थिनी या महापुरुषांबद्दल भाषण केले व आभार वैष्णवी गवळी यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button