ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी येथून इयत्ता नववीत शिकणारा मुलगा बेपत्ता

पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल, शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याचे आवाहन

पिंपरीः पिंपरी एमआयडीसी रोडवरील बौद्धनगर येथील इयत्ता नववीन शिकणारा विद्यार्थी बुधवारी अचानक बेपत्ता झाला. शाळेत जातो म्हणून सकाळी घराबाहेर पडला तो परत घरी आलाच नाही. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस शोध घेत आहेत. तसेच या मुलाला शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याचे आवाहन त्या पालकांनी केले आहे.

पालकांची पिंपरी पोलिसांत धाव
शाहिद नझीम शेख हा गोदावरी हिंदी विद्यालय आकुर्डी येथे इयत्ता नववीमध्ये शिकत असून, बुधवार दि.2ऑगस्ट 2023 शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडला तो अद्याप घरी परतलाच नाही. तो बौद्धनगर, पिंपरी एमआयडीसी रोड येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतो. शाहिद नझीम शेख याची शाळेत चौकशी केली असता शाळेत आलाच नसल्याची माहिती शाळेकडून मिळाली. त्यानंतर पालकांनी तात्काळ पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.

पालकांना संपर्क साधण्याचे आवाहन
शाहिद नझीम शेख हा दोन भाऊ, दोन बहीणी, आई, वडिलांसोबत राहतो. आई वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना ही घटना घडल्यामुळे घरातील सर्वजण दुःखी आहेत. सदर मुलगा कोणाला आढळून आल्यास संबधित पोलीस स्टेशन मध्ये व त्याच्या नातेवाईकास ( 8999413608 / 8421888413) क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या पालकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button