breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. बराच वेळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. बैठक सुरू असताना हा सर्व वाद झाला.

दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं, असं प्रत्यक्षदर्शीने महिला कार्यकर्ती म्हणाली.

हेही वाचा    –      महायुतीमध्ये आम्ही नाराज, महाविकास आघाडीची ऑफर; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत 

दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की, आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथे आलो आहोत. आम्हीदेखील अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु, यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही. आम्ही मराठा समाजाचे घटक नाही का? काहीजण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन इथे आले होते. समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही. हे काही ठराविक जण समाजाचे मालक झालेत का? असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button