TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळावर जाण्यास नागरिकांना बंदी

पुणे | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरण असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर covid-19 च्या नियमांचे पालन होणार नाही. परिणामी, परिसरातही covid-19 सह व ओमायक्रोन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटन स्थळे असलेल्या या ठिकाणी नागरिकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button