breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

चिंचवड पोटनिवडणूक : निकालापूर्वीच अश्विनी जगताप यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुची मतमोजणी अद्याप सुरू आहे. तत्पूर्वीच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अश्विनी जगताप यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित, पवार आणि जयंत पाटील यांच्यासारखे दिगग्ज नेते चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचार सभा घेत रॅली काढली होती. चिंचवड मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.

दरम्यान,भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड युवा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष, विद्यार्थी विभाग अनिकेत ज्ञानदेव शेलार यांच्याकडून फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button