ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक मुंबईहून पंढरपूरकडे रवाना

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक मुंबईहून वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरातील मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.  उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आज मुंबई आणि पुणे परिसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button