Uncategorized

एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदेंची तोफ धडाडणार, सभेची जय्यत तयारी

। जळगाव । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या मंगळवारी २० सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्‍या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार तयारीला लागले असल्याचे पहायला मिळत आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची जळगावात महत्त्वाची बैठक झाली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर तसेच सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्ह्याचा हा पहिलाचा दौरा आहे. मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. राज्यात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्याच प्रमाणे जळगाव जिल्हा दौऱ्यातही त्यांना प्रतिसाद मिळावा, यासाठी आज शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. मुक्ताईनगरची होणारी सभा ही आतापर्यंतची त्यांची मोठी सभा असेल, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव जिल्ह्याचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आमदारांची आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सभेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. ही सभा यशस्वी करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना जो काही प्रतिसाद मिळतोय, अशा प्रकारे जळगावमध्येही त्यांना प्रतिसाद मिळेल. मुक्ताईनगरची सभा ही आतापर्यंतची सर्वात मोठी सभा असेल, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी, राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेसह जिल्ह्याच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button