breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मामलेदार मिसळचा आस्वाद!

दिवाळी पहाट : नृत्यांगना गौतमी पाटील आणि तरुणाईचा एकच जल्लोष

मुंबई: दिवाळीनिमित्त् शिवसेना महिला आघाडी तसेच ठाणे शहर युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणाईशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपण सर्व सणांवरील निर्बंध काढून टाकले असून त्यामुळे प्रत्येक सण त्याच उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार असून तिथेही आपल्या सर्वांना जायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले.

Chief Minister Eknath Shinde tasted Mamledar Misal!
Chief Minister Eknath Shinde tasted Mamledar Misal!

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक राजेश मोरे, ठाणे विधानसभा अध्यक्ष हेमंत पवार, शिवसेना ठाणे महिला जिल्हा महिला संघटीका सौ.मीनाक्षी शिंदे, युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, शिवसेना टेंभीनाका शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, स्वानंद पवार हेदेखील उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तसेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि ‘झिम्मा 2’ सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि पक्षातील साथीदारांच्या सोबत जाऊन मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button