breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

छत्रपती संभाजीराजे लवकरच झळकणार चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

मुंबई | माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे हे आगामी काळात मराठी चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात काम करण्याविषयी संभाजीराजेंनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. लवकरच एका मराठी बायोपिकमध्ये त्यांच्या वंशजांची महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मला काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंचा फोन आला होता. ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करू शकता का? असं त्यांनी मला विचारलं. माझी चेहरेपट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसार मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका स्वीकारली आहे.

हेही वाचा    –    ‘..म्हणून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं’; छगन भुजबळांचा मोठा खुलासा

दरम्यान, खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत १९५२ मध्ये भारताला कुस्तीमधील पहिलं पदक मिळवून दिलं आहे. देशासाठी एवढी मोठी कामगिरी केलेल्या खाशाबा जाधव यांचं नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. लवकरच यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती ‘सैराट’ फेम सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button