breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘५४ आमदार आणि खासदारांनीही कागदावर सह्या केल्या’; छगन भुजबळांचा दावा

मुंबई : कर्जतनध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ५४ आमदार आणि खासदारांनीही भाजपाबरोबर सरकार स्थापनेसंदर्भातील कागदावर सह्या केल्या असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, एवढी चिडचिड का चाललीये हे काही मला कळलं नाही. सगळेच इकडे आले तर आम्ही काय करायचं? तुमचंही तेच तर चाललं होतं. २००४ सालीही तुमचं तेच चाललं होतं. तेव्हापासून चालूच आहे ना? यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल पटेलांना माहिती आहेत. मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती झालं, तेव्हा वाटलं की तळ्यात-मळ्यात करण्याऐवजी एकदाचा काय तो निर्णय घ्या.

५४ आमदार आणि खासदारांनीही भाजपाबरोबर सरकार स्थापनेसंदर्भातील कागदावर सह्या केल्या. सगळी मंडळी जात होती. जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल विमानात तयार बसले होते. पण जयंत पाटलांना वाटलं की परत विचारायला जावं. पण मग साहेब म्हणाले थांबा, नका बसू विमानात. शिवाय हे एकदा झालेलं नाही. अनेकदा झालंय. तुम्ही एखाद्या पक्षाला एकदा हो म्हणून सांगितलं आणि नंतर तुम्ही मागे सरलात तर ते एकदा ठीक आहे. पण प्रत्येक वेळी तेच तेच घडतंय, असा आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केला.

हेही वाचा  –  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा! विराट, रोहितला विश्रांती

आम्ही काय आमचा पक्ष सोडलाय का? आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अडचण काय आहे? म्हणे मार्ग बदलला. नितीश कुमार भाजपाबरोबर जाऊन आले. काय झालं? आहेत तिथेच आहेत. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही गेल्या होत्या. मग त्यांची विचारधारा बदलली का? आम्हीही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सरकारमध्ये गेलो. त्याआधी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. तसं म्हटलं तर शिवसेना आणि भाजपा विचारधारा सारखीच आहे. मग तिकडे गेलं तर चालतं आणि इकडे गेलं तर चालत नाही असं कसं? असं छगन भुजबळ म्हणाले.

आम्ही सगळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारमध्ये गेलो आहोत. सत्ता काय, आम्ही अनेकदा मंत्री झालो आहोत. त्यात काय आहे? पण जनतेच अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायला आम्ही गेलो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेनं आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. तारीख पे तारीख चलता है. न्याय आपल्या बाजूनेच होईल, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button