ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड आणि सांगवी वाहतूक विभागातील वाहतूक नियोजनात बदल

वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न : वाहनचालकांना मिळणार दिलासा

पिंपरी: वाकड आणि सांगवी वाहतूक विभागातील शिवसाई लेन व गोविंदा चौक, कोकणे चौक, रघुनाथ गोडांबे चौक, कावेरीनगर अंडरपास परिसरात सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने बुधवार (दि. ८) आणि (दि. ९) पासून परिसरात पर्यायी रस्ता, नो पार्किंग आणि पी १, पी २ यासारखे निर्बंध लागू केले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

शिवसाई लेन व गोविंदा चौक

पिंपळे सौदागर भागातील शिवसाई लेन व गोविंद यशदा चौकाजवळील ७ स्टार रस्त्याच्या दरम्यान कर्माशिअल शॉप व रहिवाशी वस्ती मोठया प्रमाणात असुन दाट लोकवस्ती आहे. कमर्शिअल शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची रस्त्यावर मोठी वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजुने वाहने पार्क झाल्याने वाहतुक कोंडी होते. तसेच वाहने पार्क झाल्याने या ठिकाणाहून वाहनांना यु टर्न घेण्यास अडथळा निर्माण होत असुन या ठिकाणी किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सांगवी वाहतुक विभागांतर्गत शिवसाई लेन व गोविंद यशदा चौकाजवळील ७ स्टार रस्त्याच्या दरम्यान पी १ पी २ झोन घोषीत करण्यात आला आहे. त्याची अमंलबजावणी उद्या मंगळवार (दि. ८) पासुन करण्यात येत आहे.

कोकणे चौक ते रघुनाथ गोडांबे चौक

सांगवी वाहतुक विभागामध्ये कोकणे चौक ते पार्क स्ट्रिट सोसायटी ते कोकणे चौक दरम्यान रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. कोकणे चौक ते रघुनाथ गोडांबे चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुस दररोज दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होवून वारंवार किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात होत असतात. त्यामुळे कोकणे चौक ते एन एस स्नॅक्स सेंटर मेन रोड, रघुनाथ गोडांबे चौक ते कोकणे चौकपर्यंतचा मेन रोड आणि रघुनाथ गोडांबे चौक ते कोकणे चौक चौपाटी सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन घोषीत करण्यात आला आहे. त्याची अमंलबजावणी उद्या मंगळवार (दि. ८) पासुन करण्यात येत आहे.

कावेरीनगर

कावेरीनगर अंडरपास हा अरुंद असून १६ नंबरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची रुंदी खुपच कमी आहे. तसेच त्या ठिकाणावरून पवारनगर गल्ली व थेरगावकडे जाणारी लेन असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. वाकड वाहतुक विभागांतर्गत कावेरीनगर सब वे मधुन दुचाकी, रिक्षा खेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. कावेरीनगर वेणुनगरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणारे वाहन चालक गुजरनगर अंडरपास येथून इच्छित स्थळी जातील. १६ नंबरकडून वेणुनगर, कावेरीनगरकडे जाणारे वाहन चालक काळेवाडी फाटा येथून यु-टर्न घेवून इच्छित स्थळी जातील. त्याची अमंलबजावणी बुधवार (दि. ९) पासुन करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button