टेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

हवामान खात्याकडून अलर्ट जारी… देशात मुंबई सगळ्यात उष्ण शहर

मुंबई ः ऐन हिवाळ्यात मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात मुंबई सर्वात उष्ण शहर ठरले आहे. मागील दोन दिवसांपासून सांताक्रूझमध्ये 35 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे कमाल तापमान 35.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर गुरुवारी शहरात 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत 35.4 अंश सेल्सिअस, पुणे 32.3 अंश सेल्सिअस आणि डहाणू 31.8 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उष्णतेची लाट कधी येते?
जेव्हा किनारी प्रदेशाचे तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचते आणि 4.5 ते 6.4 अंशांच्या दरम्यान सामान्य पासून निर्गमन होते. तेव्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. जेव्हा तापमानात वाढ एकापेक्षा जास्त स्टेशनवर आणखी दोन दिवस टिकते, तेव्हा प्रदेशासाठी उष्णतेची लाट घोषित केली जाते.

अरबी समुद्रातील बदलामुळे मुंबईला ढगांचे आच्छादन दिसून येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शहरात ईशान्येकडील वारे वाहतील, ज्यामुळे तापमानात घट होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सलग दोन दिवस सांताक्रुझ वेधशाळेने सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. परंतु आणखी काही दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button