breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा”; चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवार यांच्या पुढाकारने अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकलता दाकवत बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केलं होतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांच्याशी बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून संवाद साधला. मी अजूनही विनंती करतो, त्यांना मी भेटायला तयार आहे. चिंचवड पोटनिवडणूक त्यांनी बिनविरोध करावी. अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन निवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती. जसे अंधेरीच्या निवडणुकीत पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेऊन चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करावी. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती महाविकास आघाडीला आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button