ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांना ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ पुरस्कार

कोरोना काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल
– लंडनमधील ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून केला सन्मान

पिंपरी । प्रतिनिधी
कोविड-१९ च्या काळात सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्मीयांसाठी मोफत विवाह सोहळा तसेच इतर सामाजिक उपक्रमांची दखल लंडन मधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली आहे. या संस्थेने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट ह्या सन्मानपत्राने डब्ल्यू बीआरचे उपाध्यक्ष उस्मान खान यांनी सन्मानित केले. या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी जय भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या संकटात गरजूंना मदत करण्यासाठी अनेकजण आपापल्या परीने सामाजिक काम करत असताना चिखलीतील जितेंद्र यादव व त्यांच्या पत्नी शितल यादव यांनी एक स्त्युत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला होता. हे दाम्पत्य स्वर्गीय अलकाताई यादव व जयभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब व सामान्य कुटुंबातील विवाह ठरलेल्या सर्वधर्मीय विवाहेच्छुकांचे मोफत विवाह लावून दिले. कोरोना नियमांचे पालन करून हे विवाह लावले. कुटुंबातील मोजक्या लोकांनी फक्त नवरा आणि नवरीला घेऊन कार्यालय, मंडप, लग्नाचा पोषाख, गृहोपयोगी वस्तू आणि जेवण मोफत देऊन विवाह लावून दिले. .
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक विवाहेच्छुकांचे विवाह लांबणीवर पडले आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते साधेपणाने विवाह करत आहेत. परंतु, लॉकडाऊनच्या आधी विवाह ठरलेल्या पण आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या विवाहेच्छुकांसमोर पोट कसे भरायचे हा प्रश्न पडला आहे. त्यातून अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलले आहे. अशा सर्वांच्या मदतीसाठी चिखलीतील जितेंद्र व शितल यादव दाम्पत्य पुढे आले आहे आणि या दाम्पत्याने विवाहेच्छुकांचे विवाह मोफत लावून देण्याचा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या दाम्पत्याने स्वर्गीय अलकाताई यादव व जयभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. कोरोना नियमांचे पालन करून हे मोफत विवाह सोहळे पार पाडले.कोरोना काळात सर्व धर्मीय मोफत लग्न सोहळे तसेच अनेक सामाजिक उपक्रम जनसेवक जितुभाऊ यादव, जय भवानी प्रतिष्ठाण, सर्व कार्यकर्ते, आणि समस्त ग्रामस्थ चिखली यांच्या माध्यमातुन राबविले जात आहेत. याची दखल ह्या संस्थेने घेतली. हा सन्मान मुंबई येथील जेडब्ल्यू मरियेट हाॅटेल मध्ये पार पडला. चिखलीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे.
कार्य छोटे असो अथवा मोठे, त्या कार्यासाठी धावपळ करत असलेल्या सर्व मित्र परिवाराला हा सन्मान समर्पित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button