breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारचा मोठा धक्का; गहू आणि तांदळाची विक्री थांबवली!

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री थांबवली आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या कर्नाटकसह काही राज्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.

Economic Times ने दिलेल्या वृत्तानुसार OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ राज्ये आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी प्रति क्विंटल ३,४०० रुपये विक्री सुरू राहील. बाजारातील किंमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार FCI OMSS अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून तांदूळ दिला जाऊ शकतो.

१२ जून रोजी, केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी OMSS अंतर्गत तांदूळ-गहू देण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा – विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव…महापालिका शाळांची ‘घंटा वाजली’

सरकारने OMSS अंतर्गत १५ लाख टन गहू केंद्र सरकारकडून खाजगी व्यापारी आणि गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ई-लिलावाद्वारे विकण्याची घोषणा केली होती. या व्यापाऱ्यांना OMSS अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या तांदळाचे प्रमाण निश्चित करण्यात आले नव्हते.

केंद्र सरकारने २६ जानेवारी २०२३ राजी OMSS धोरण आणले होते. या अंतर्गत राज्यांना त्यांच्या योजनांसाठी ई-लिलावात भाग न घेता FCI कडून तांदूळ आणि गहू दोन्ही खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button